1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:05 IST)

झोका खेळताना फाशी लागून मुलाचा मृत्यू

Boy hanged while playing Zoka in Amalner jalgaon   Mundada Nagar 1 at Amalner in Jalgaon District    vedant sandip patil amalner  death news in marathi
झोका खेळणे कोणालाही आवडते. विशेषतः मुलांना झोका खेळणे खूप आवडते. मात्र लहान मुले झोका खेळताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. अन्यथा काहीही अघटित घडण्याची शक्यता असते. झोका खेळताना फास लागण्याच्या घटना घडतात. असं होऊ नये या साठी मुले झोका खेळत असताना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जळगाव मध्ये झोका खेळताना 15 वर्षाच्या मुलाचा फास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मुंदडा नगर 1 मध्ये झोका खेळताना एका 15 वर्षीय मुलाचा फाशी लागून मृत्यू झाला. वेदांत संदीप पाटील असे या मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिकायचा. वेदांतचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहे. 
 
या घटनेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी मृत वेदांतच्या शवाला शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

Edited By- Priya Dixit