राज्यात थंडीची लाट 24 तास राहील, पुण्यात थंडीचा कडाका दोन दिवस कायम राहण्याची शक्यता
पुढील 24 तास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता देखील आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहणार आहे. औरंगाबाद आणि जालन्यातही थंडीची लाट असणार आहे. किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
पुण्यात थंडीचा कडाका दोन दिवस कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
सोमवारी किमान तापमान खाली उतरेल तर मंगळवारी तापमान 11 अंश सेल्सिअसच्या जवळ सल्याचे सांगण्यात येत आहे. वामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आणि लगतच्या भागामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांममध्ये तापमानाचा पारा घसरू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे.
Edited By- Priya Dixit