शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (08:58 IST)

मुकेश अंबानी झाले आजोबा; इशाने दिला जुळ्या बाळांना जन्म

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आजोबा झाले आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या इशा हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे. दोन्ही बाळांसह आई इशा यांची तब्ब्येत उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. ज्यामध्ये आकाश आणि ईशा ही जुळी भावंडे आहेत. तर अनंत अंबानी सर्वात लहान आहेत. ईशा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा ती वयाच्या १६ वर्षांती होती. आणि ती जगातील सर्वात तरुण अब्जाधीश वारसांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती.
 
३० वर्षीय ईशा अंबानीने येल विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा हिने येथे मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे. इशा अंबानीने अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीतही काम केले आहे.
 
सध्या ईशा ही अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे मार्केटिंग काम पाहते. २०१६ मध्ये फॅशन पोर्टल अजियो लाँच करण्याचे श्रेय तिला जाते. वडील मुकेश अंबानी यांनी एकदा सांगितले की, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लॉन्च करण्यामागील प्रेरणा ईशा अंबानी होती. भाऊ आकाश अंबानी याला ब्रँडिंग आणि ग्राहकांच्या निर्णयांमध्ये ईशाने मोठी मदत केली.
 
ईशाने आनंद पिरामल यांच्यासोबत लग्न केले आहे. आनंद पिरामल यांच्या वडिलांचे नाव अजय पिरामल असून ते पिरामल ग्रुपचे प्रमुख आहेत. आनंद पिरामल-ईशा अंबानी यांचा विवाह डिसेंबर २०१८ मध्ये झाला होता. जुळ्या बाळांच्या जन्माबाबत रिलायन्स समुहाने माहिती दिली आहे की, आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांनी १९ नोव्हेंबर रोजी सर्वशक्तिमान ईश्वराच्या कृपेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा आणि मुलं, मुलगी आदिया आणि मुलगा कृष्णा छान आहेत. आदिया, कृष्णा, ईशा आणि आनंद यांच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा इच्छितो, असे नीता आणि मुकेश अंबानी, स्वाती आणि अजय पिरामल, पिरामल आणि अंबानी कुटुंब यांनी सांगितले आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor