सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:27 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाची वेळ बदलली

महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार सर्व प्रकारची धार्मिक स्थळे दि. ०७ ऑक्टोबर २०२१ पासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने श्री त्र्यंबकेश्वर मंदिरही सकाळी ०७:०० ते रात्री ०८:०० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. मात्र आता भाविकांची वाढती गर्दी व अनेक भक्तांची मागणी लक्षात घेऊन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दि. २७ नोव्हेंबर २०२१ पासून श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ०६:०० ते रात्री ०९:०० वाजेपर्यंत खुले राहील. मात्र अजूनही कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती कायम असल्याने यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार सर्व भाविकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे