गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (15:18 IST)

आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र : अंबादास दानवे

अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. यापूर्वी टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील समोर आली होती.सत्तार यांच्या मुलींचीं नावे टीईटी घोटाळ्यात समोर आले होते. त्यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सत्तार यांना स्थान देण्यात आलं.
 
नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही सत्तारांची शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.  सोबतच सत्तार यांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तार यांच्या मुलीच्या पगाराची कागदपत्र देखील आपल्याकडे असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
 
मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना माझ्याकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या पगाराची कागदपत्र असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.