शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (11:03 IST)

Rain Update: मुंबई पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता

monsoon
राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र 29 तारखे पासून मुंबई पुण्यासह पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला पावसाची हजेरी लागू शकते. 

जुलै महिन्यात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. काल मुंबई आणि ठाणे भागात पावसाने हजेरी लावली. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.