रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:17 IST)

उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार

नाशिकच्या पाथर्डी भागात उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीवरून इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.पांडवलेणी समोरील उड्डाण पुलावरून इगतपुरी येथे राहणारे गोरख लक्ष्मण जाधव,व सोमनाथ लक्ष्मण जाधव हे दोघे भाऊ नाशिकवरून इगतपुरीच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा सख्या भावांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे..
 
या घटनेने जाधव कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत एम्ब्युलंसच्या साहाय्याने दोन्ही मृ’तदेह हे सिव्हील हॉस्पिटलला पाठवण्यात आलेय,तर अज्ञात वाहन चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला असून. या बाबत अधिक तपास अंबड पोलिसांमार्फत सुरू आहे. या घटनेने काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती..