सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (12:46 IST)

वेगाने धावणाऱ्या कारीच्या अपघातात दोन ठार

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार घरातील कम्पाऊंडवॉल मध्ये जाऊन धडकली ही धडक एवढी जोरदार होती की या अपघातात दोन तरुणी जागीच ठार झाल्या.तर एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे.त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला असून यात दोन तरुणी जागीच ठार झाल्या.तर दोन तरुण जखमी झाले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन मुली आणि दोन मुलं असे चौघे मित्र मैत्रिणी रात्रीच्या वेळी बोलेरो कारने निघाले होते.ते चौघे वाडीजवळ एका हॉटेलात जेवण करण्यासाठी थांबले.घरी जाताना चिराग  नावाचा तरुण कार वेगाने चालवत होता.त्याचा एक मित्र त्याच्या जवळच्या सीटवर बसला होता.मागील सीटवर तरुणी बसल्या होत्या. वेगाने कार चालवत असताना चिरागचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार फुटपाथवर चढून बाजूच्या झाडाला जाऊ धडकून जवळच्या घराच्या कंपाउंड मध्ये घुसून उलटली.घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी दखल घेऊन चौघांना बाहेर काढून रुग्णालयात नेले.तिथे गेल्यावर दोघी तरुणींना डॉ.ने  मयत घोषित केले.घटना झाल्यावर कारचालक चिराग हा पळून गेला त्याला पोलिसांनी शोधून अटक केली.कारच्या एयरबॅग मुळे दोघे तरुण वाचले .तर त्या दोघी तरुणी वेळीच मदत न मिळाल्यामुळे जागीच दगावल्या.