रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (13:31 IST)

कोल्हापुरात धावत्या बसने पेट घेतला,सर्व प्रवाशी सुखरूप

fire
पुण्याहून कोल्हापूर कडे जात असताना अचानक धावत्या एस टी बस ने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळून खाक झाली ही घटना रविवारी पहाटे तावडे हॉटेल परिसरात घडली.या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे धावत्या बसने पेट घेतला आणि बघता-बघता संपूर्ण बस जळून खाक झाली.परंतु सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.यामधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.