गुरूवार, 6 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मार्च 2025 (09:02 IST)

गडचिरोलीमध्ये ८ लाखांचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादींना अटक

arrest
Gadchiroli News: फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये दिरंगी-फुलनार येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सी-६० जवानाच्या हत्येसह विविध प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने बुधवारी फेब्रुवारी २०२५ मध्ये गडचिरोलीतील दिरंगी-फुलनार येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सी-६० जवानाची हत्या आणि माजी पंचायत समिती अध्यक्षाची हत्या यासह विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर सरकारने ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.