शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:07 IST)

दक्षिण आफ्रिकेतून दोन जण नाशिकला परतले… जाणून घ्या त्यांचे काय झाले

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटने सध्या जगभरात धास्तीचे वातावरण आहे.दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन दोन खेळाडू नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी परतले. दरम्यान महापालिकेने या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते आणि या दोन्ही खेळाडूंचे संस्थात्मक विलगीकरणक करण्यात आले होते.
आता या दोघांचेही रिपोर्ट्स आले असून दोघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. असं असलं तरीही नाशिककरांनी आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान देशात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉन संदर्भात दोन मीटिंग झाल्या. एक टास्क फोर्ससोबत आणि संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. या नव्या विषाणूला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये संपूर्ण डेल्टा व्हेरियंटने बाधित रुग्णांना ओमिक्रॉनने ग्रासलेले आहे. या विषाणूची संसर्गजन्यता अधिक असल्याचं स्पष्ट आहे. त्याचं टेस्टींग आरटीपीसीआरने होऊ शकतं, हे स्पष्ट झालंय. जागतिक आरोग्य संघटना याबाबत अधिक माहिती देत आहे, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी सांगितलय..!