सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (16:25 IST)

दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून दुर्देवी मृत्यू

माजलगावातील बीड तालुक्यात महातपुरी येथे आपल्या मावशीकडे सुट्ट्यात आलेल्या दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी घडली आहे. दीपाली गंगाधर बरबडे(20 रा.आनंदगाव ता.परतूर) आणि स्वाती चव्हाण(12) असे या मृत्युमुखी झालेल्या बहिणीचे नाव आहे. त्या काही दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे राहणाऱ्या आपल्या मावशी कडे सुट्ट्यात आलेल्या होत्या. मयत दोघी मावस बहिणी आहे. त्या आपल्या मावशी आणि आई सोबत गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास स्वाती बंधाऱ्यात अंघोळ करताना पाय निसटून पाण्यात पडली आणि बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी दीपाली पाण्यात गेली आणि त्या दोघी पाण्यात बुडाल्या. 

त्यांना पाण्यात बुडताना पाहून बंधाऱ्यावरील महिलांनी आरडाओरड केली आणि लोकांना मदतीसाठी बोलावले. तो पर्यंत त्या बुडाल्या होत्या. त्यांना शोधण्यात सुमारे एक तास गेला. त्यांना शोधून त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.