मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (14:30 IST)

मालेगाव महापालिकेची महासभा वादळी; घरकुल, सफाईच्या मुद्यावरून नगरसेवकांनी घातला गोंधळ

malegaon mahapalika
मालेगाव महापालिकेची महासभा वादळी; घरकुल, सफाईच्या मुद्यावरून नगरसेवकांनी घातला गोंधळ
मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महासभा वादळी चर्चेत संपन्न झाली. म्हाळदे शिवारातील आयएचएसडीपी घरकुल योजना शहरातील साफसफाई तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या मुद्द्यावर सभागृहात नगरसेवक यांनी प्रशासनाला धारेवर धरत जोरदार गदारोळ केला.तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झालेल्या मालेगावच्या शुटिंगबॉलपटूना महापालिकेने दहा लाख रुपये देण्याची मागणी आग्रही मागणी सदस्यांनी केली.