मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:20 IST)

कारखान्यात भीषण स्फोटात होरपळून 2 कामगारांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन त्यात दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी आणि ह्रदयद्रावक घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. 

भुसावळच्या सुनसगावात दिया कॉपर मास्टर अलायझ नावाच्या फॅक्टरीत दुपारी ऑइल टाकीला दोन कामगार वेल्डिंग करत असताना स्पार्किंग होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोघे कामगार होरपळले आणि त्यांच्या जागीच दुर्देवी अंत झाला. काशिनाथ आणि खेमसिंग असे या मयत झालेल्या कामगारांची नावे आहे. मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली . तो पर्यंत या कामगारांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळतातच तालुका भुसावळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली .