शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (07:57 IST)

भाऊबीजदिनीच अपघात; दोन तरुण जागीच ठार

death
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. २६ ऑक्टोंबर) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात घडली.
 
संगमनेर ते साकुर रोडवरील पिंपळगाव देपा परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम.एच.१७ सी.जी. ९९४८) जोरदार धडक दिली. यात ओम राहुल पेंडभाजे (वय-१९, रा. साकुर) व शुभम सदाशिव टेकुडे ( वय-१८,देवगीरे वस्ती, साकुर)  हे दोघेही जागीच ठार झाले. याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी,  अमोल पेंडभाजे व शुभम टेकुडे हे दोघे तरूण बुधवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून संगमनेरकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही ठार झाले. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या दोन्ही तरूणांच्या अपघाती मृत्यूने साकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor