शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:20 IST)

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला, व्हिडिओ चर्चेत

In a public event in Satara
साताऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला. नेत्याचं कार्यकर्त्याप्रती असं प्रेम पाहून असंख्य कार्यकर्ते फिदा झालेत. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या तुफ्फान चर्चेत आहे.
 
खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्याला पेढा भरवला, त्या कार्यकर्त्याचं नाव विनोद मोरे आहे. उदयनराजे भोसले आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावतात. त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा देतात. साताऱ्यातील गोडोली येथे  विनोद मोरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. विनोद मोरे हे उदयनराजेंचे चाहते आहेत. यावेळी चाहत्याचं कौतुक करण्यासाठी उदयनराजेंनी त्यांना चक्क तोंडाने पेढा भरवला.