चंद्रकांत पाटील यांनी केली महत्वाची 'ही' घोषणा
एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींसमोर पेच निर्माण झाला होता. अनेक परीक्षार्थी एमपीएससी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, यंदा २१ ऑगस्ट रोजीच दोन्ही परीक्षा आल्यामुळे नेमकं करायचं काय? असा प्रश्न परीक्षार्थींसमोर उभा राहिला. त्यासंदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींसाठी मोठी घोषणा केली असून त्यांच्यासाठी तारीख बदलण्याचा पर्याय देण्यात येईल असं ते म्हणाले आहेत.
या दोन्ही परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी या CET च्या सेलला संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या परीक्षार्थींना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना CET परीक्षेसाठी तारीख बदलून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.