रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (11:34 IST)

आता नोटाबंदीवरून उद्धव ठाकरे- फडणवीस यांचे वाकयुद्ध

नोटाबंदीचा तुम्हाला नक्की किती फटका बसला ते एकदा जाहीर करून टाका अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली होती. त्याला उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले आहे. इतके निर्लज्ज सरकार कधीच पाहिले नाही. मला नोटबंदीचा फटका बसला, कारण रांगेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, हाच माझ्यासाठी मोठा फटका आहे. 
 
नोटबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच नोटाबंदी करणार्‍या भाजपवर बंदी घाला असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचबरोबर, 53 इंचची छाती असेल आणि हृदय नसेल तर काय उपयोग असा सवाल उद्धव ठाकरेंनी सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.