शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 ऑगस्ट 2024 (17:06 IST)

कार्यकर्ते माझे 'वाघ-नख' आहेत आणि ते "अब्दाली'ला घाबरत नाही म्हणत उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर टीका

शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी एका सभेला संबोधित करत असताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांच्यावर टीका केली असून ते म्हणाले, माझे कार्यकर्त्ये वाघनख आहे आणि ते अब्दालीला घाबरत नाही. 
 
वाघ-नख' किंवा वाघ-पंजा हे हाताने पकडलेले शस्त्र आहे. 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा वापर केला होता.हे शस्त्र सध्या सातारा येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.
 
नुकतेच उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शहा यांना ‘अहमद शाह अब्दाली’ असे संबोधले होते. ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला होता.त्यावरून ठाकरे यांनी अमितशाह यांना अहमद शाह अब्दाली म्हटलं होत. 
शनिवारी एका सभेत ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका करत माझे कार्यकर्त्या माझे वाघ नख आहे मला अब्दालीची भीती वाटत नाही असे म्हटले. 
Edited by - Priya Dixit