शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उद्धव ठाकरे नव्या वर्षात ‘मातोश्री 2’मध्ये शिफ्ट होणार

uddhav thackeray to shift in Matoshree 2
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नव्या वर्षात ‘मातोश्री 2’या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. वांद्रे कलानगर येथील या निवासस्थानासमोरच आठ मजली ‘मातोश्री 2’ इमारत तयार झाली आहे. ठाकरे कुटुंबीय सध्या ‘मातोश्री’ या 10 हजार स्क्वेअर फूट जागेवरील निवासस्थानी राहतात. 
 
नव्या इमारतीची जागा 2016 मध्ये 11 कोटी 60 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती. सुरुवातीला या इमारतीला सहा मजल्यांचीच परवानगी होती, पण नंतर आणखी दोन मजल्यांची परवानगी देण्यात आली. आठ मजल्यांच्या ‘मातोश्री’ 2 इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर तीन ड्युप्लेक्स फ्लॅट आणि पाच बेडरुम आहेत. स्टडी रुम, स्विमिंग पूल, हॉल अशा अनेक सुविधा यामध्ये असतील. प्रत्येक मजल्यावर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती राहणार असल्याचं बोललं जातं.