बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (10:38 IST)

मनोहर जोशींनी इतिहास घडवला - उद्धव ठाकरे

uddhav thakare
काही वर्षापूर्वी ज्या शिवतीर्थावरून हाकलून दिले होते आणि शिवसैनिक ज्यांच्या बद्दल  ओरड करत होते ते होते मनोहर जोशी मात्र आज स्थिती बदलली आहे. आता मनोहर जोशींनी इतिहास घडवला असे गौरवउद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. मनोहर जोशी यांचा ८० वा वाढदिवस होता.
 
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या समोरच मोदींच्या निर्णयाचं कौतुक केल आहे. पंतप्रधान \त्यांची योजना चांगली आहे आणि हे देशाच्या हितासाठी आहे अशी स्तुतीसुमनं मनोहर जोशी यांनी उधळली आहेत. मनोहर जोशींच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरीत्रांचं आज मुंबईत प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. एका वेळी मनोहर जोशी यांना अपमानित केले होते तेच आता कौतुक करत आहेत असे चित्र होते.