गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मे 2018 (15:44 IST)

भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी : उद्धव ठाकरे

uddhav thakare
भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. जे जिंकले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी त्याने मराठी माणसाचा आदर करावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.