बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 4 जून 2021 (15:50 IST)

भयंकर, मामाने भाच्याची दगडाने ठेचून केली हत्या

नागपूरमध्ये मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची  घटना वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. शहराच्या सीमेवर वाडी परिसरातील पीक्स कंपनीमागे मैदानावर ही घटना घडली. अतुल लष्कर असे हत्या झालेल्याचे नाव आहे. कौटुंबीक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 
 
 तुल दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असताना  एक मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी वाडीतील पीक्स कंपनीमागील मैदानात आढळून आला. त्याच्या डोक्यावर वार केलेल होते. कपड्यांवरुन तो अतुल लष्कर असल्याचे पुढे आले. अतुल एक कॅन्टीनमध्ये कामाला होता. त्याच्यावरही मारहाणीचे गुन्हे दाखल आहे.
 
अतुलची आई आणि बहीण काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती.त्याबबात अतुल नेहमी मामाला विचारणा करायचा. त्यावरुन अतुलचा मामासोबत  अनेकदा वाद होत होता. दोघांमध्ये खटकेही उडायचे. या कारणावरुन काही दिवसांपूर्वी अतुलने  मामाला मारहाणही केली होती. बुधवारी आरोपी मामा आणि अल्पवीयने संशयीत आरोपीने अतुलला पिक्स कंपनीच्या पाठीमागे बोलवले. तिथेच अतुल आणि आरोपींचा जोरदार वाद झाला होता. तिथेच मामाने भाच्याची हत्या केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.