1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (20:35 IST)

महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार;ते देखील आहे की नाही?

uddhav thackeray
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत.त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सरकारवर टीकास्र डागले आहे. राज्यात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला असल्याचे ते म्हणाले.आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे पण हे सरकार तरी आहे की नाही,असा प्रश्न पडला आहे. प्रदुषण पाहिल्यानंतर आपल्या असंवैधानिक सरकारने जाहीर केले होते की मुंबईतील रस्ते धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि प्रदुषण कमी झाले असावे.
तेलंगणात जाऊन
 
कोणत्या भाषेत बोलणार?
“परंतु, त्याचवेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात.त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती मागवली पाहिजे.आज जे मुख्यमंत्री स्वतःचे घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळतात. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत गुवाहाटीचा चोरटेप्रकार त्या लोकांना सांगणार आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
 
या राज्याचा मायबाप कोण?
“हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. दुसरे दोन हाल्फ कुठे आहेत माहित नाहीत. मग शेवटी या राज्याचा मायबाय कोण आहे?आपल्या कृषीमंत्र्यांनी जाहीर केले होते की, दिवाळीपूर्वी पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर नंतर ते दिसले नाहीत. दिवाळीत फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज ऐकू आला नाही.
पण शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली का? मिळाली असेल तर कितीजणांना मिळाली? जी काही माहिती येत आहे त्यानुसार, काहींना २० रुपयांचा चेक मिळाला. ही तर शेतकऱ्यांची थट्टा झाली”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.