शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (09:05 IST)

केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स होमक्वारंटाईनबाबत जारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठीच्या होमक्वारंटाईन्सबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोनाबाधितांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य केले होते. होमक्वारंटाईनच्या या नव्या गाईडलाईन्स सर्व राज्यांनी तातडीने लागू करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.
 
अशा आहेत नव्या गाईडलाईन्स
होमक्वारंटाईन असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना किमान सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल, होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची गरज नाही, वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होमक्वारंटाईनची परवानगी दिली जाईल, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच उपचार घेतील, यासाठी घरात व्हेंटिलेशन असणे गरजेचे आहे, रुग्णांना ट्रिपल लेअर मास्क वापरावा, रुग्णांना आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थ खावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
 
शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांना होमक्वारंटाईनची परवानगी असेल, एचआयव्हीबाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी दिली जाईल. रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्स, सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे करण्यास मनाई आहे. सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण जे होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात रहावे लागेल, ज्यामुळे त्यांची चाचणी करण्यास आणि गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात बेड वेळेवर मिळण्यास मदत होईल.