सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (21:25 IST)

संजय राऊत गोवा दौऱ्यावर, कोरोनाची लागण झालेली नाही

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकूण ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर कुटुंबात आई, मुलगी, पत्नी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. संजय राऊतांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांची मुलगी, पत्नी, आई आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. संजय राऊत बैठकांना हजर राहिले होते. तसेच घरगुती कार्यक्रमादरम्यान सदस्यांचा अनेक लोकांशी संपर्क झाला आहे. यामुळे कोरनाची लागण झाली आहे. संजय राऊत गोवा दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.