शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (08:58 IST)

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर; "या" मातब्बरांचा पत्ता झाला कट

Union Minister Narayan Rane will not be given a chance in this election
मुंबई :- भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप नेते विनोद तावडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही
 
भाजपने महाराष्ट्रात एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे त्या नाराज होत्या.
 
भाजपने अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.