गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:50 IST)

पक्ष्यांसाठी अनोखे बर्ड पार्क, चला पहायला जाउया

जगभरातील 60 हून अधिक विविध प्रकारच्या प्रजातींमधील 500 हून अधिक पक्ष्यांचा समावेश असलेल्या बर्ड पार्कचा शुभारंभ मुंबईतील एस्सलवर्ल्डमध्ये झाला. त्यामुळे पक्षी अभयारण्यात एक्झॉटिक आणि अनुभवात्मक फेरीचा अनुभव देणारा भारतातील हा पहिला उपक्रम ठरला आहे. हे पार्क पर्जन्यवनाच्या संकल्पनेनुसार 1.4 एकरांत पसरले आहे. या पार्कमध्ये पक्ष्यांसाठी खास स्वयंपाकघर आणि आरोग्यकेंद्रही बनवले आहे.
 
या पक्षांना पर्यटक हाताने त्यांना खाणे देऊ शकतात आणि त्यांच्यासोबत फोटोही काढू शकतात. फिडिंग डेक, रेनफॉरेस्ट वॉक, रेनबो वॉक अशा विविध वस्तू विकत घेता येणार आहेत. त्यासाठी शॉपिंग नेस्ट व वुडपेकर्स स्टेडिअम नावाचे अ‍ॅम्फिथिएटरही आहे. पक्षी म्हणजे निसर्गाची सर्वात सुंदर आणि रंगबिरंगी निर्मिती आहे. त्यामुळेच त्यांचे संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे आहे. आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्ल्यू गोल्ड मकाव, कॉकाटेल, रेनबो लोरिकीट, टौकान, ब्लॅक लोरी आणि वॉयलेट टुराको, कॅलिफोर्निया क्वेल, गोल्डन फीजंट आणि ऑस्ट्रिच (शहामृग) यासारखे जमिनीवरील पक्षी तसेच ब्लॅक स्वान, अमेरिकन वूड डक आणि मँडरिन डक यांसारखे पाणपक्षांच्या अनेक प्रजाती येथे आहेत.