गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (17:33 IST)

राज्यात अवकाळी अस्मानी संकट, पुढील तीन दिवस पावसाचे

rain
राज्यावर पुन्हा अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. याला मंदोस असे नाव देण्यात आले आहे. राज्यात पुढील आठवड्यात या चाकरी वादळाचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार असून राज्यातील 13 जिल्ह्याना अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत या चक्रीवादळामुळे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग 65 ते  85 किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.  तसेच 12,13,14 डिसेंबर रोजी  मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  
 
तसेच राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  राज्यात कोकण , मुंबई, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
Edited by - Priya Dixit