मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (10:55 IST)

राज्यात अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका

राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. नाशिकमधील देवळा भागाला शनिवारी अवकाळी पावसानं चांगलच झोडपलं, पिकांचं मोठं नुकासान झाल्यानं इथला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर मेशी परिसरात दिवसाआड दुसऱ्यांना अवकाळी पावसानं हजेरी लावली.
 
कळवण तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील हिरापूर, भोयेगावसह अनेक गावांमध्ये तुरळक पाऊस झाला. यावेळी काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारंबळ उडाली.
 
उमराणे परिसरात पावसामुळं कांदा रोप आणि रब्बी पीक, काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मालेगाव शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण पाऊस झाला नाही. त्याचबरोबर वणी, डांगसौदाणे, रेडगाव खडजाम, महालपाटणे, देवपूरपाडे, ब्राह्मणगाव, निवाणे, ठेंगोडा, किकवारी बुद्रुक, अभोणा आणि इगरपुरी या भागातही पावसानं तुरळक हजेरी लावली.
 
नागपुरात गारपीट झाली. विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जोरदार पावसासह उपराजधानीत गारपीट पाहायला मिळाली. उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तसंच गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी मुंबईतही पाऊस पडला.