शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:43 IST)

आपण कायदे करतो मग आपणच हेल्मेट वापरू, सरकारी कर्मचारी हेल्मेट वापरणार

use helmet
सध्या राज्यात हेल्मेट सक्ती सुरु झाली आहे. अनेक शहरात अनेकदा जनजागृती होते मात्र कोणीही स्वतः हेल्मेट वापरत नाही, यामध्ये सांस्कृतिक राजधानी पुणे तर मागे कसे ? तेथे तर हेल्मेट सक्ती होणार आहे. याच धर्तीवर आता हेल्मेट विरोधाची धार बोथट करण्यासाठी पोलिसांनी सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना आजपासून  हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस म्हणले की ‘आपण कायदे तयार करतो कायद्यांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे शासकीय नोकरदारांनी हेल्मेटचा वापर करावा अन्यथा कारवाई केली जाईल’असे स्पष्ट केले आहे. पुण्यातील रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे ठार होण्याचे प्रमाण फार मोठे असून, यामुळे अनेक कुटुंब अडचणी येत आहे. दुचाकीस्वारांनी स्वतःच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरने आवश्यक आहे. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेट सक्ती करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारपासून पुण्यातील राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह इतर सर्व शासकीय कार्यालयातील नोकरदारांना हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक केले आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता जे कायदा करतात त्यांना सुद्धा हेल्मेट वापरावे लागणार आहे.