शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:39 IST)

सलमान खानच्या वडिलांना शेरा कडून जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध आणि विवादित अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना फोनवरून ठार मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. धमकी देणारा फोन करत म्हणाला की मैं छोटा शकील का आदमी हू! सलमान का नंबर देना! नही तो जान से मार दूंगा अश्या प्रकारे धमकावले आहे. प्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गुंड शाहरुख गुलाबनबी उर्फ शेरा याला अटक केली आहे. मुंबई येथील वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  मी छोटा शकीलचा माणूस आहे सलमान खानचा नंबर द्या नाहीतर ठार करेन अशी धमकी  शेराने दिली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा शेरा टायर विक्रीचा व्यवसाय करतो. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळा फोन केले होते. याआगोदर ६ ऑक्टोबर रोजी सलीम खान यांनी त्यांचा मॅनेजर विकास हेमेंद्रकुमार छाया यांना अशाच प्रकारे धमकीचा फोन केला होता.