सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (20:57 IST)

उत्तर प्रदेश उद्यम प्रदेश होण्याच्या मार्गावर- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश उद्यम प्रदेश होण्याच्या मार्गावर आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित होते.
 
श्री. फडणवीस म्हणाले की, योगीजींनी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर उत्तम पद्धतीने नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील उद्योग व्यवसायांना चालना मिळाली आहे.
 
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी सांगितले की आपण राज्यपाल झाल्यावर  राजभवन सामान्य माणसासाठी खुले केले. आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश हे राज्य देशातील सर्वोत्तम राज्य ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी, ‘‘ उत्तर प्रदेश में श्री काशी विश्वनाथ धाम बा, उत्तर प्रदेश में राममंदिर बा, उत्तर प्रदेश में कानून सुव्यवस्था बा’’ असा जयघोष करत उत्तर प्रदेशची प्रशंसा केली.
 
मुंबईत उत्तर प्रदेश दिवस सुरु करणारे अमरजीत मिश्र यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन आर. यू. सिंग यांनी केले. आर.डी.यादव यांनी सूत्रसंचालन केले. विनय त्रिपाठी यांनी आभार मानले.