आरक्षण टिकवायचे आहे तर मग वंचित बहुजन आघाडीला साथ द्या
वंचित बहुजन आघाडीचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेव आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली सून, आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं त्म्हयांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर पुन्हा टीका केली आहे. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्यावी लागेल असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केल आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली, तर आमचं 27 टक्के आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसींनाही देखील असून, लोकांच्या मनातून ही भीती काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्ष हे काहीच करत नाहीत. ओबीसी, मराठा आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिली पाहिजे असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ. ओबीसी आरक्षणाला अ आणि मराठा आरक्षणाला ब असा गट दिला असता, तर ओबीसी आरक्षण जाणार नाही यांची भीती निर्माण होणार नाही असे ही आंबेडकर म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या वंचित आघाडीचा उमेदवार निवडणून आला नाही मात्र यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार इतर पक्षांचे पडले तर लाकोंच्या रूपाने वंचित ने मतदान ओढून घेतले आहे.