शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (15:50 IST)

वाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा

shinde
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. या संघर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.
 
मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता. मात्र, रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू, असे आश्वासन दीले. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या.
 
या केल्या घोषणा –
 
औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी रुपये, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार, जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद, मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता, या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.