दाभोली गावचा वसंत दाभोलकर यू.पी.एस.सी. परीक्षेत देशात 76 वा
सिंधुदुर्ग : आय.ए.एस. होण्याचे स्वप्न होणार साकार जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पुढे मिळवले मोठे यश पहिल्या प्रयत्नात 465 वी तर दुसऱ्या प्रयत्नात मिळवली 76 वी रँक
जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेल्या वसंत प्रसाद दाभोलकर या सिंधुदुर्गच्या आणखीन एका सुपुत्राने यू.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वी रँक पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गात टँलेंटचा झेंडा रोवला. जिल्हा परिषद दाभोली शाळा, त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधून माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्स मधून इंजिनिअरिंग पदवी मिळावीणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसऱ्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले. त्याची ही रँक पाहता तो आता आय.ए.एस. अधिकारी होणार हे निश्चित आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor