शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:04 IST)

श्री सप्तशृंगी माता दर्शनाबाबत अतिशय महत्वाची बातमी

Very important news about Shri Saptashrungi Mata Darshan
नाशिक: साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आता लस घेतलेल्यांनाच दर्शन घेता येणार आहे.
तसेच 60 वर्षावरील आणि दहा वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.संस्थांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आणि राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियमावलीनुसार आता मंदिरात प्रवेश मिळणार आहे. सप्तश्रींगी देवीचे दर्शन घेण्यासाठी लसीकरण असणे आवश्यक आहे. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस ज्याने घेतला असेल त्यालाच श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येणार आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी ई-पास असणे गरजेचे आहे. विश्वस्त संस्थेने www.ssndtonline.org या संकेतस्थळावर इ-दर्शन पास उपलब्ध करून दिला आहे. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे असेल त्याने या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती नोंदवून इ-पास  तयार करून घेणे बंधनकारक आहे.
तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर ई-पास आणि लसीकरण झालेला संदेश दाखवणे बंधनकारक करण्यात आला आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी नियम केले करण्यात आले आहे.