1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (09:58 IST)

नाटक पाहतानाच ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे यांचा मृत्यू

Veteran theater actor Rajabhau More
अमरावतीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग बघताना आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अंबागेट बुधवारा, अमरावतीतून सकाळी 11 वाजेच्या सुमारास निघेल. 

अमरावतीत सध्या राज्य नाट्य स्पर्धा सुरु आहे या शृंखलेत राजाभाऊ मोरे हे आज अनिल बर्वे यांचे लिखित थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकाचा प्रयोग पाहण्यास गेले होते. त्यांना तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले .मात्रत्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात 3 बहिणी, 2 भाऊ, असा परिवार आहे. मोरे हे अविवाहित होते. राजाभाऊ यांना जीवनगौरवाने सन्मानित केले होते. नाट्यक्षेत्र कलाकारांनी त्यांच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

Edited By - Priya Dixit