गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (20:00 IST)

Vice President Election 2022 : एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर विजयी झाले आहेत. धनखड यांना 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 खासदारांची मते फेटाळण्यात आली आहेत. धनखड आता 11 ऑगस्टला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे.
 
शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेले उपराष्ट्रपतीपदासाठीचे मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली. निकाल जाहीर झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते  जल्लोष करत आहेत. त्याचबरोबर भाजप कार्यालयातही जल्लोषाची जय्यत तयारी सुरू आहे.