1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:15 IST)

पुस्तके, गणवेशासाठी पालकांवर जबरदस्ती करणाऱ्या शाळा बंद करू – विनोद तावडे

विद्यार्थांना पुस्तके, गणवेश याच शाळेतून घ्या, असा आग्रह कोणतीच शाळा करू शकत नाही. शालेय साहित्यांची विक्री करणे हे शाळेचे काम नाही. असे प्रकार कोणती शाळा करत असेल, तर ताबडतोब बंदची कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.
 
नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयाचा (वायसीसीई) दीक्षांत समारंभात त्यांनी हा इशारा दिला. शाळांच्या व्यावसायिकतेवर तावडे यांनी रोष व्यक्त केला. कोणतीच शाळा विद्यार्थ्यांना असा आग्रह करू शकत नाही. शाळांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांच्या माध्यमातून असे नियमबाह्य काम सुरू असेल, तर शाळा बंद करण्याचे आदेशच दिले जातील. अशा तक्रारी नागरिकांनी शासनाकडे दाखल करण्याची गरज आहे, असेही तावडे म्हणाले.