बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (16:43 IST)

विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले

आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपूरात श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी आज अर्गुथात गुरुवारी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे.यावेळी आषाढ द्वितीयेला शुभ दिवसाचा मुहूर्त पाहून सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
 
विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले. सकाळी देवाच्या पूजेनंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला.