शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (09:38 IST)

विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन शक्य

पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांना घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे. या हेतूने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन सुरु करण्यात आले आहे. श्री विठ्ठलाचे थेट दर्शन पुरविण्याबाबत मंदिर समितीकडून हक्क देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यामुळे अनेक टीव्ही चॅनलने हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र मंदिरे समितीने जिओ कंपनी व टाटा स्काय कंपनीला विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क दिले आहेत.
 
आजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाऱ्या भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर समितीला यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.