रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2019 (08:48 IST)

नाशिकला लवकरच मिळणार हायब्रीड मेट्रो - मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. शहरात लवकरच हायब्रीड मेट्रो आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल आहे. यासाठीचा आराखडा तयार झाला असून, लवकरच प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी विधानसभेत त्बोयांनी दिली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हायब्रीड मेट्रोचं रुपांतर मेट्रोमध्ये करण्यात येणार आहे. तर मेट्रो आणि हायब्रीड मेट्रो यांच्या किंमतीत मोठा फरक आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की मुंबई शहरात 1.16 लाख कोटी रुपयांचं काम सुरु आहे. यापैकी तीन मार्गिका 2021 आणि 2022 अशा दोन टप्प्यात सुरु होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी एमएमआरडीएचं क्षेत्र 3965 चौरस किमी होतं, जे आता 4355 चौरस किमी करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. नाशिकच्या मध्ये होणाऱ्या हायब्रीड मेट्रोसाठी प्रति किमी 50 कोटी, तर मुख्यं  मेट्रोसाठी प्रति किमी 275 कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.