रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2019 (09:10 IST)

केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणारा गजाआड

अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.  या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. सतीश पाटील असं ट्रोल करणाऱ्याचं नाव आहे. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनसुद्धा सादर केलं होतं. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
 
काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने हिंदी भाषेतून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’आहे असंदेखील म्हटलं होतं. यावरून केतकीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली होती. यामध्ये काहींनी अश्लील, शिवराळ आणि खालच्या स्तरातील भाषा वापरली.