बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जानेवारी 2026 (17:16 IST)

मनपा निवडणूक राज्यभरात जोरात

मनपा निवडणूक राज्यभरात जोरात
महाराष्ट्रातील राजकारणासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. राजभरातील १५ पेक्षा जास्त महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडले आहे. सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
 
तसेच सकाळपासून मतदारांचा उत्साह होता. व आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः मुंबई (BMC) आणि पुणे (PMC) मध्ये सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का चांगला दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रभावाचा हा मोठा कस आहे.तर पुण्यात राज ठाकरे यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. वाहतूक आणि पाणीप्रश्न हे इथले मुख्य मुद्दे ठरले आहे.
 
राज्यातील दिग्गज नेत्यांनी आपापल्या केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.राज ठाकरे यांनी मुंबईत सहकुटुंब मतदान केले.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही आपापल्या मतदारसंघात सकाळीच मतदान पूर्ण केले.सर्वच नेत्यांनी जनतेला "लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करा" असे आवाहन केले आहे. तसेच कडेकोट बंदोबस्तनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्रांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये. 
तसेच उद्याचे निकाल राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारे असतील. विशेषतः मुंबई आणि पुण्यातील सत्ता कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Edited By- Dhanashri Naik