गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (08:14 IST)

पावसाची आणखी सात दिवस प्रतीक्षा

rain
Waiting for seven more days of rain राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत तर मराठवाडा, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
 
पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या १०-१२ दिवसात मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, १८ ते २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर २५ ते ३१ ऑगस्ट या काळात विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड या भागातही पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सरासरी इतका पाऊस किंवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.
 
मराठवाड्यात चिंता वाढली
अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नांदेड वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नाही. मागील ६० दिवसांत फक्त ३७.८ टक्के पाऊस झाला आहे तर विभागात अजूनही १३ टक्के पावसाची तूट असून, शेतकरी संकटात सापडला आहे.