गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (17:40 IST)

राज्यात जोरदार पावसाचा इशारा

राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात
पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसधार पाऊस झाला आहे.

हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरातील चार गावात काल सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.पिकांचं नुकसान झाले आहे. 
 
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 
 
सिंधूदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. राज्यात काही भागात आणि काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.