बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (16:46 IST)

बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवासासाठी लागणार्‍या स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी गर्दी

ST smart card
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी 1 जुलैपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. 
 
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर पात्र प्रवाशांनी पुढील महिन्यापासून स्मार्ट कार्ड आणणे बंधनकारक असल्यामुळे ते मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. सध्या ओळखपत्रे स्वीकारली जात परंतु 1 जुलैपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक असल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि इतर सुविधाप्राप्त नागरिक स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत.
 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबरपासून पुकारलेला संप यामुळे आगार आणि विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया होऊ शकली नाही. सवलतीधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता शेवटचे दिवस सुरु असल्यामुळे बसस्थानकावर नागरिकांची गर्दी होत आहे. स्मार्ट कार्ड जारी करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.