शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated: गुरूवार, 23 जून 2022 (15:43 IST)

कृषिकन्या करताहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

krushikanya
कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान या बरोबरच प्रथमच आंबा, काजू व नारळ या पिकांवर होणाऱ्या किटकांच्या प्रादुर्भावातून पिके कशी वाचवावीत. याचे डेमोव्दारे प्रात्यक्षित दाखवून या फळपिकांचे नुकसान कसे टाळावे. कृषिकन्या  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताहेत.
 
ग्रामीण कृषी जागृकता विकास योजना कार्यानुभव प्रकल्प अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवी मध्ये शिकणाऱ्या कृषिकन्या तनया सावंत, ईश्वरी भोगटे, तन्वी देसाई, पूजा गवंडळकर, तन्वी राणे, धनश्री ढवण, रुदाली मासये यांचे लोरे गावचे येथील सरपंच अजय रावराणे यांचेसह शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले.
 
यावेळी शेतीतील नवीन तंत्रज्ञान पीक पध्दती कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशी फायदेशीर असते. आपल्या  कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाने तसेच या भागांत दरवर्षी आंबा, काजू व नारळ या महत्वपूर्ण उत्पन्न देणाऱ्या फळबागायतीवर होणाऱ्या तुडतुडे, भुरी, करपा, कोळी या रोगांविषयी व ते नष्ट करण्यासाठीच्या उपाय योजनांची माहिती तज्ञांमार्फत देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते.