1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:59 IST)

तेव्हा तुमचा मेंदू सिल्व्हर ओकवर गहाण होता का

Bhatkhalkar slammed Shiv Sena leader MP Sanjay Raut
"सेलिब्रिटींना मेंदू नाही का हा प्रश्न फक्त देशाचा आवाज बुलंद करणाऱ्यांबाबत पडतो का? रिहानाचे समर्थन करताना हा प्रश्न का पडला नाही? तेव्हा तुमचा मेंदू सिल्व्हर ओकवर गहाण होता का संजय राऊत?," असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर टीका केली. 
 
 याआधी "सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? तुम्हाला सेलिब्रिटी रस्त्यावरच्या याच लोकांनी केलं ना?, या गरीबांना जे समजतं ते तुम्हाला का समजत नाही?, तुम्हाला कोण वापरून घेतंय हे समजत नाही का?" सवाल संजय राऊत यांनी केले होते.